छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): राजस्थान प्रकोष्ठ एवं महिला प्रकोष्ठतर्फे सागर लॉन्स येथे आरती की महिमा कार्यक्रम आयोजित केला होता. छत्रपती संभाजीनगर येथे प्रथमतः आयोजित या आगळ्या वेगळ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात राजस्थानी समाजातील ११ समाजांनी विविध देवी-देवतांच्या आरती चे महत्व नृत्यनाटीकेद्वारे सादर केले.
कार्यक्रमात विशेषकरून माहेश्वरी समाज गणेश, राजपूत समाज लक्ष्मीजी सोनार समाज, श्री बालाजी भगवान, खंडेलवाल समाज-श्रीरामजी प्रभू, विप्र समाज-श्री दुर्गामाताजी, सेन समाज-श्रीकृष्णजी, अग्रवाल समाज-श्री खाटू श्यामजी, जैन समाज - श्री हनुमानजी, प्रजापति समाज श्री महादेवजी, जांगिड़ समाज श्री रामदेव बाबा, दर्जी समाज श्री विठ्ठल पांडुरंग या प्रकारे प्रत्येक समाजाने आपल्या ग्रुप च्या १५ सदस्यांद्वारे आरती की महिमाचे नृत्यनाटीके द्वारे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून
उपस्थितांची दाद मिळवली. प्रमुख अतिथि म्हणून नगरसेविका सुरेखा सानप, शिल्पारानी वाडकर, डॉ. जीवन राजपूत, राजस्थान प्रकोष्ठचे मार्गदर्शक सी. एस. सोनी, सीए आर. बी. शर्मा, सत्यनारायण अग्रवाल, डॉ. पुरुषोत्तम दरख, नरेंद्र खंडेलवाल, कैलाश खंडेलवाल, काशीनाथ दरख, शिवनाथ राठी, सचिन करवा, विजयकुमार गौड, मुकेश नाटाणी, नरेश सुरग, मोहनलाल भाटी, श्रीमती चंदा वर्मा, प्रमिला दुसाद, रीतू अग्रवाल तसेच राजस्थानी समाजाचे दो हजारांवर समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प प्रमुख अंकिता अग्रवाल, भाग्यश्री बनभेरू, ज्योति अपूर्वा, सारिका जोशी, सोमनाथ तांबी, अरुण राठी, धर्मेंद्र जांगिड़, हरिओम राठौड, अॅड. विशाल निमोदिया तसेच राजस्थान प्रकोष्ठ व महिला प्रकोष्ठच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. ३ तास चाललेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने झाले. सूत्रसंचलन धर्मेंद्र जांगिड़ व दीपाली भारडिया यांनी केले तर आभार महिला सरचिटणीस चंचल करवा यांनी मानले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions













